Tarun Bharat

बीएससी, एमसीसीसी संघांची विजयी सलामी

बेळगाव : रॉजर्स क्रिकेट क्लब एमसीसीसी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेवकोटा चषक 13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी बेळगाव स्पोर्ट्स क्लबने रॉजर्स क्लबचा 3 गड्यांनी तर एमसीसीसीने फिनिक्सचा 17 धावांनी पराभव केला. लक्ष खतायत (बीएससी), अब्रार (एमसीसीसी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भोबाडे, अभिनव कुमार, सुभाषचंद्र, प्रशांत पुत्रण, सारिका पुत्रण, प्रमोद पालेकर, महांतेश गवी, विठ्ठल कुरडेकर, सुनील देसाई, गौस हाजी, अमय पुजारी आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टींचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात रॉजर्स क्लबने 20 षटकात 9 बाद 83 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससीने 15.3 षटकात 7 गडी बाद 84 धावा करुन सामना 3 गड्यांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात एमसीसीसी संघाने 20 षटकात 8 बाद 130 धावा केल्या. त्यात अब्रारने 1 षटकार 2 चौकारांसह 33 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फिनिक्स संघाने खेळताना 20 षटकात 8 गडी बाद 113 धावाच केल्या. त्यात अब्रारने 1 षटकार 2 चौकारांसह 33, मयंकने 5 चौकारांसह 30 धावा तर अवधूतने 15 धावा केल्या. फिनिक्सतर्फे साईश, निर्णय यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना 20 षटकात 5 गडी बाद 113 धावाच केल्या. त्यात सर्वज्ञाने 3 चौकारांसह 32 तर जिआनने 13 धावा केल्या.

Related Stories

रिंगरोडविरोधात 823 हरकतींची नोंद

Amit Kulkarni

श्रीधर माळगीची राष्ट्रीय संघात निवड

Amit Kulkarni

धुक्यात हरवले ‘बेळगाव’

Amit Kulkarni

ग्रा. पं. जमिनींवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

Omkar B

सिंधुदुर्ग सोसायटीतर्फे परब यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

खासगी अनुदानित शाळा-कॉलेज शिक्षकांचे मंगळवारी आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!