Tarun Bharat

पाक महिला संघाची विजयी सलामी

Advertisements

वृत्तसंस्था/ सिल्हेत (बांगलादेश)

महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने मलेशियाचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात पाक संघातील फिरकी गोलंदाज ओमिमा सोहेल आणि तुबा हसन यांची कामगिरी दर्जेदार झाली. पाकच्या तुबा हसनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून मलेशियाला प्रथम फलंदाजी दिली. मलेशियाने 20 षटकात 9 बाद 57 धावा जमविल्या. मलेशिया संघातील इलेसा हंटरने एकाकी लढत देत 51 चेंडूत नाबाद 29 धावा झळकविल्या. पाकच्या ओमिमा सोहेलने 19 धावात 3, तुबा हसनने 13 धावात 2 गडी तसेच डायना बेग आणि सादिया इक्बाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकने 9 षटकात 1 बाद 61 धावा जमवित विजय नोंदविला. पाक संघातर्फे कर्णधार बिस्मा महारुफने नाबाद 8, तसेच अलीने नाबाद 21 धावा जमविल्या. पाकच्या डावाला मुनिबा अली आणि सिद्रा अमीन यांनी बऱयापैकी सुरुवात करून दिली. या जोडीने चौकार अधिक ठोकले. मलेशियाच्या इस्माईलने अमीनचा बळी मिळविला. अमीनने 23 चेंडूत 31 धावा जमविल्या. मलेशियातर्फे इस्माईलने 8 धावात 1 गडी बाद केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाकचा संघ सध्या दोन गुणासह तिसऱया स्थानावर आहे. मलेशिया चौथ्या स्थानावर असून त्यांना आपले खाते उघडता आले नाही.

संक्षिप्त धावफलक ः मलेशिया 20 षटकात 9 बाद 57 (हंटर नाबाद 29, ओमिमा सोहेल 3-19, तुबा हसन 2-13, डायना बेग, सादिया इक्बाल प्रत्येकी एक बळी), पाक 9 षटकात 1 बाद 61 (सिद्रा अमीन 31, बिस्मा महारुफ नाबाद 8, अली नाबाद 21, इस्माईल 1-8).

Related Stories

अर्जुन पुरस्कारासाठी वर्धन, शिबनाथ यांची शिफारस

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा साडेतीन दिवसातच एकतर्फी विजय

Patil_p

न्यूझीलंड-अफगाण सामना पावसामुळे रद्द

Amit Kulkarni

अडथळा आणल्याने लंकेचा गुणतिलके बाद, विंडीज विजयी

Amit Kulkarni

लंकन क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई

Patil_p

आयओसीच्या कोरोना लसीकरण ऑफरची दक्षिण आफ्रिकेकडून समस्यांचे सूर

Patil_p
error: Content is protected !!