Tarun Bharat

video : कोरोना रूग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा भन्नाट डान्स !

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

कोरोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत आहे. आरोग्य कर्मचारी असतील किंवा समाजातील इतर घटक असतील कोरोना रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. काहीजण मदत करत आहेत. सोशल मीडियवर अशाप्रकारचे अनेक व्हिडओ देखील व्हायरल होत असतात. सध्या आसामधील एका कोविड सेंटरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यानी पीपीई किट घालून रुग्णांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील डीगबोई भागात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील हा व्हिडिओ आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. पीपीई कीट घालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांसोबत डान्स आणि व्यायाम केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा भन्नाट डान्स नेटकऱ्यांना भलताच आवडत आहे. नेटकऱ्यांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.



कोरोना रूग्णांचे मनोबल वाढवणे, त्यांना या रोगाशी लढण्यासाठी , मात करण्यासाठी तयार करणे हाच या आरोग्या कर्मचाऱ्यांचा हेतू आहे. रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी उचलेलं पाऊल कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर या सर्वांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

जयपूरमध्ये समूह संसर्गाचा धोका

Patil_p

#TokyoOlympics: बॉक्सिंग स्टार मेरी कॉमची विजयी सलामी, हर्नांडिज गार्सियावर केली मात

Archana Banage

भारत बायोटेकचा लसवापरासाठी अर्ज

Patil_p

मुंबईतील धक्कादायक घटना;अत्याचार करुन केले ‘हे’ अमानवी कृत्य

Archana Banage

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान

Rohit Salunke

इंदोरमध्ये दुर्घटनेत 6 मित्रांचा मृत्यू

Patil_p