Tarun Bharat

‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांच्या व्हिडिओचा होणार फॉरेन्सिक तपास

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Video of ‘Pakistan Zindabad’ slogans to be forensically investigated टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने देशभरात केलेल्या कारवाईविरोधात शुक्रवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर’, ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन राजकारण तापू लागले असतानाच पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या व्हिडिओंचा फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त सागर पाटील म्हणाले, पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचे सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ते आम्ही एकत्र करणार आहे. त्यानंतर त्याचा फॉरेन्सिक तपास करण्यात येणार आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली, त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रस्ता अडवणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, हिंसाचाराचा प्रयत्न आदींबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर’, ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. त्या व्हिडिओंचा तपास करण्यात येणार आहे. या तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील, त्यानुसार आणखी काही कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल.

अधिक वाचा : कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

या आंदोलनात सहभागी झालेल्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका स्पष्ट असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Related Stories

मुक्ता टिळक अनंतात विलीन

datta jadhav

बाळासाहेबाच्या स्मारकामध्ये तोतया मुख्यमंत्र्यांना स्थान नाही- उद्धव ठाकरे

Abhijeet Khandekar

राजेश क्षीरसागर यांचे पोष्टर फाडले, रवी इंगवले यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल

Rahul Gadkar

चीनकडून पाच दिवसात महाराष्ट्रात 40,300 सायबर हल्ले

datta jadhav

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जणांना अटक

datta jadhav

पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 747 रुग्ण कोरोनामुक्त 

Tousif Mujawar