Tarun Bharat

घरावर दगड मारणारा जन्माला आलेला नाही- एकनाथ शिंदे

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आज महाराष्ट्रात बाळासाहेब-आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना- भाजपाचे सरकार प्रस्थापित झाले. गेले १५-२० दिवस माझ्यावर विश्वास ठेवून मोठा निर्णय घेतला त्या ५० आमदारांचे आभार मानतो. तसेच अभिनंदनही करतो. स्व:तचे मंत्रीपद दाव्याला लावून आमच्या सोबत आले. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, उठाव केला. आमच्या उठावाची ३३ देशांनी नोंद घेतली. मविआत राज्यसभा, विधानपरिषदेवेळी मला वाईट वागणूक दिली. माझे खच्चीकरण करण्यात आलं. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेलं पण लढणार असं ठरवलं होतं. लढून मरेनं पण माघार नाही असं ठरवून बाहेर पडलो. मला सगळ्यांचे फोन आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. चर्चेला माणसं पाठवून मला गटनेते पदावरुन काढून टाकण्यात आले. पक्षासाठी रक्तांच पाणी केलं. पण आमचे बाप काढले, शिविगाळ केली असा निशाणा त्यांनी संजय राऊत यांच्यावर साधला. भाषणा दरम्यान एकनाथ शिंदे दिघे यांच्य़ा आठवणीने भावूक झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा जन्माला आलेला नाही. पक्षासाठी रक्तांच पाणी केलं. हे बंड एका दिवसाचे नाही. अन्याविरुध्द हे बंड आहे. आता माघार नाही असं ठरवलं. मी पक्षासाठी काम करत असताना मी माझ्या कुटुंबाला कधी वेळ दिला नाही. माझी मुलं मेली. या वेळेत मला दिघेंनी साथ दिली. माझ्यावर १०० पेक्षा जास्त केसेस आहेत. मी १६ बार बंद केलं. प्रत्येक आंदोलनात मी कधी मागे पडलो नाही. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मी कोलमोडलो होतो. पण त्यातून मी सावरलो. कारण दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसेना आक्रमक झाली होती. यावेळी ते वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न केला. पण आम्हाला गद्दार म्हणण्यात आले. शिवीगाळ केली. पण आम्ही शिवसैनिक आहोत आणि राहणारचं असंही ते म्हणाले.

आम्ही नैसर्गिक युती केली. काल, आज आणि उद्या आम्ही शिवसैनिकचं राहणार.उध्दव ठाकरे यांनी आम्ही जाताना माहित होतं. ठाकरेंनी आयजीला नाकाबंदी करायला सांगितली. पण यातून कसं सुटून जायचं हे मला माहित होत. आम्ही एका विचाराने बाहेर पडलो आहोत. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आमचा शत्रू आहे असे ते म्हणाले होते. बांगड यांचा मला रात्री दिडला फोन आला.मी त्यांना बोलावलं नाही. मी कोणावरही जबरदस्ती केली नाही. हे सर्व एका विचाराने एकत्र आले आहेत. मविआत आमचं कोणी एेकूण घेतलं नाही. पुढच्या आमदारकीला राष्ट्रवादीचाचं आमदार असेल जयंत पाटील त्यांच्या भाषणात म्हणायचे. त्यामुळे शिवसैनिक चलबिचल झाला. आणि यातूनचं बंडाला सुरुवात झाली.

भाजपा हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यांनी प्रेमाने लढाई जिंकली.आम्ही आमची पातळी सोडली नाही. टपरीवाले, रिक्षावाले म्हणून आम्हाला हिणवले. पण आता मोदी-शहांचे पाठबळ मिळाले आहे. आता केंद्राच्या मदतीने राज्याला प्रगतीकडे घेवून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. इंधनावरील व्हॅट कमी करणार आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त करणार. रायगडमधील हिरकणी गावाला २१ कोटीचा निधी यावेळी जाहीर केला.



Related Stories

“फक्त हिंदू सणांमध्येच सांस्कृतिक दहशतवाद…”

Abhijeet Shinde

गेहलोत सरकारने जिंकला ‘विश्वासदर्शक ठराव’

Rohan_P

पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन

Sumit Tambekar

शिवसेना मविआतून बाहेर पडणार पण… राऊतांनी घातली ‘ही’अट

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात ‘या’ दिवसापासून सर्व प्रार्थनास्थळे खुली होणार

Abhijeet Shinde

दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!