Tarun Bharat

विधानपरिषदेला गाफील राहणार नाही- सतेज पाटील

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांना ईडी चौकशी लागली आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यामध्ये उद्यापासून निदर्शने करणार आहोत. विधानपरिषदेची तयारी करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसचे सगळे आमदार १७ आणि १८ जूनला एकत्र येणार आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) महाविकास आघाडीचे १०० टक्के उमेदवार निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. आज त्यांनी कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर नेमकी कशी तयारी करण्यात आली हे सांगितले.

हेही वाचा-राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही चौकशी

भाजपवर टीका करताना सतेज पाटील म्हणाले, भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे ओबीसी आमदार नाराज आहेत. त्याचा परिणाम विधान परिषदेतील मतदानानंतर भाजपला (BJP) दिसेल. अनेक भाजप आमदारांना वेगळ्या गोष्टी सांगून भाजपमध्ये नेण्यात आले होते. नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असे सांगून भाजपाने आपल्याकडे वळवले. २०१९ मध्ये विधान परिषदेसाठी किमान १०० उमेदवार जाहीर केले होते. मात्र गेल्या अडीच वर्षात यातील कोणताच शब्द भाजप पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे भाजपात अलबेल आहे असे समजू नये त्यांच्यातही प्रचंड नाराजी आहे असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

हेही वाचा- Monsoon Update : राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार एंट्री ,तर वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय नव्हता असे बालले जात आहे असा प्रश्न विचारताच पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय होता. तीन पक्षाची मत आम्हाला मिळाली. या निवडणूकीत पक्षाच्या आमदारांनी प्रतोदाला दाखवून मतदान केलं, मात्र बाकीच्यानी घोळ केला यामुळे एक उमेदवार निवडून आला नाही. मात्र विधानपरिषेला आम्ही जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी उमेदवार निवडून आणण्यासाठी जी राज्यसभेत कमतरता राहिली ती कमतरता न राहता बी प्लॅननुसार सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये राजभवनावर काँग्रेस नेत्यांचा आज मोर्चा आहे. उद्या जिल्ह्यामध्ये निदर्शने करणार आहोत. नियोजनानंतर सर्व आमदार मुंबईमध्ये एका ठिकाणी येतील असेही ते म्हणाले.

Related Stories

साताऱयात मिळणार सॅनिटायझर शॉवर

Patil_p

कोडोलीचे लोकनेते, कोडोली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांचे निधन

Archana Banage

टाकाळा येथे गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी

Archana Banage

राज्याची परिस्थिती चांगली कशी : चंद्रकांत पाटील

Archana Banage

पुण्यात आज कडकडीत बंद, डेक्कन परिसरातून मूक मोर्चाला सुरूवात

datta jadhav

सातारा :आंबेदरे येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला

Archana Banage