Tarun Bharat

म्हापशात आज विधिता केंकरेचा गायनाचा कार्यक्रम

प्रतिनिधी /पणजी

म्हापसा येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानात श्रावणी बुधवारनिमित्त आज दि. 24 रोजी संध्याकाळी 7 वा. अमीर गायतोंडे कुटुंबियांतर्फे सावंतवाडी येथील प्रसिद्ध युवा गायिका विधिता केंकरे हिचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तिला तबल्यावर नितीन कोरगावकर व संवादिनीवर प्रसाद गावस साथसंगत करतील.

  विधिता ही संगीत विशारद असून विविध स्पर्धांमधून तिने पुरस्कार पटकाविले आहेत. तिने रघुनाथ मेस्त्री व आग्रा घराण्याचे पं. उमेश मेस्त्री यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे. भारत गायन समाज, पुणे च्या बालगंधर्व स्मृती नाटय़संगीत प्रथम पुरस्कार पटकावून ती बालगंधर्व पुरस्काराची मानकरी ठरली आहे. अटल प्रति÷ान सिंधुदुर्ग आयोजित संस्कृत गीतगायन स्पर्धेत सलग तीन वर्षे तिने प्रथम येण्याचा मान मिळवला. अखिल भारतीय सारस्वत कल्चरल ऑर्गनाझेशन,मुंबई च्या सुगमसंगीत स्पर्धेची ती उपविजेती ठरली. मालवण येथे झालेल्या राम गणेश गडकरी साभिनय नाटय़गीत स्पर्धेत तिने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. शिवाय कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणी अनेक स्पर्धामधून ती चमकली आहे. आता तिने मुंबई विद्यापीठात गायन विषयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

Related Stories

आयएसएलमध्ये आज ब्लास्टर्स-चेन्नईन लढत प्रतिष्ठतेसाठी महत्वाची

Patil_p

गोव्यातील प्रत्येक घराला 31 मार्च पर्यंत शौचालय, वीज व पाणी पुरवठा

Patil_p

पावसामुळे रावण सत्तरीत भातशेतीला फटका

Amit Kulkarni

पर्वरी पोलीस वसाहतील इमारतींची दैयनीय अवस्था

Patil_p

सांतइस्तेव्ह येथे कदंबच्या दोन बसेस बंद पडल्या

Amit Kulkarni

दिवगाळी नार्वे येथे गव्याची गोळी झाडून हत्या

Omkar B