Tarun Bharat

विद्या भारती जिल्हास्तरीय शैक्षणिक व क्रीडा संमेलन उत्साहात

Advertisements

क्रीडाप्रतिनिधी /बेळगाव

हुक्केरी येथील श्री महावीर शिक्षण संस्था शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हास्तरीय विद्याभारती शैक्षणिक संमेलन व क्रीडा स्पर्धा आयोजनाबद्दलची बैठक उत्साहात पार पडली.

हुक्केरी येथील महावीर शिक्षण संस्थेच्या सभागृहात या बैठकीत शैक्षणिक संमेलनाला प्रमुख पाहुणे  स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, महावीर निलजगी, परमेश्वर हेगडे, वसंत माधव, आर के कुलकर्णी, विठ्ठल हलगेकर, एस व्ही व्हनुगल, गंगाधर भोसले, प्रमुख वक्ते अजय उदोशी, माधव पुणेकर, संत मीराच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्या हस्ते सरस्वती, ओंकार, भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. वसंत माधव यांनी प्रास्ताविक करीत विद्या भारतीच्या कार्याची माहिती दिली. जिल्हा शैक्षणिक संमेलनाची माहिती आर. के. कुलकर्णी यांनी दिली तर प्रज्वल निलजगी यांनी उपस्थितांचे अभिवादन केले.

अशोक पाटील, माधव पुणेकर, परमेश्वर हेगडे यांनी जीवनात शिक्षणाचे महत्त्व, व आजाद हिंद सरकार शिक्षणाचे महत्त्व, नवीन शैक्षणिक धोरण, याबद्दलची माहिती शिक्षकांना दिली त्यानंतर विविध शाळा व्यवस्थापन मंडळ, क्रीडाशिक्षक जिल्हास्तरीय शैक्षणिक, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, शिशुवाटिका याबाबत चर्चा करण्यात आली व आगामी काळात होणाऱया विविध कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली,

या शैक्षणिक संमेलनाला संत मीरा अनगोळ, गोपाळ जिनगौडा स्कूल शिंदोळी, स्वामी विवेकानंद हायस्कूल खानापूर, शांतिनिकेतन स्कूल खानापूर, हनिवेल पब्लिक स्कूल खानापूर, ज्ञान प्रबोधिनी स्कूल, सी व्ही रामन स्कूल, वीरराणी स्कूल, संत मीरा स्कूल गणेशपूर, श्री महावीर प्राथमिक व माध्यमिक शाळा हुक्केरी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हुक्केरी शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.

Related Stories

शहरवासियांनी सूर्यग्रहणाचा आविष्कार अनुभवला

Patil_p

मे -जूनमध्ये एसएसएलसी आणि पियुसी परीक्षा : एस. सुरेशकुमार

Amit Kulkarni

एसकेई सोसायटीने आजवर लाखो विद्यार्थी घडविले

Amit Kulkarni

भारती विद्यालयात बहिर्जी शिरोळकर पुण्यतिथी

Patil_p

डॉ. कोडकिणी आय सेंटरमध्ये नवीन साधनांचा उद्घाटन समारंभ

Amit Kulkarni

प्रिंटींग व्यावसायिकांना विशेष पॅकेज द्या

Patil_p
error: Content is protected !!