बेळगाव : धारवाड येथील गरक आरव्हीके विद्या केंद्र शाळा, कर्नाटक राज्य विद्याभारती पुरस्कृत धारवाड विद्याभारती जिल्हा आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला.
प्रमुख पाहुणे आरव्हीके विद्या केंद्र गरक शाळेचे प्रशासक कुमारस्वामी कुलकर्णी, सचिव राघवेंद्र अंबेकर व शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता रै, स्पर्धा सचिव महांतेश देग्गावी यांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारत माता फोटो पूजन, खेळाडूंची ओळख व फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी श्रीनिवास पटगार, शशिधर हुगार, पंच मारुती एम., विनायक एम. शुभम, निरंजन सावंत, सीआर पाटील, चंद्राप्पा उपस्थित होते. या स्पर्धेत यजमान धारवाड, बेळगाव, गुलबर्गा, मंगळूर, बेंगळूर जिह्यातील प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या संघांनी भाग घेतला आहे.