Tarun Bharat

KOLHAPUR(FULEWADI) रिंकू देसाई यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, मध्यरात्री तीनच्या सुमारास झाली तोडफोड

कोल्हापूर- आज रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फुलेवाडी रिंगरोडवरील सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्या घरावर अज्ञात तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात बंगल्याच्या खिडकीच्या काचा, झाडांच्या कुंड्या फोडत प्रचंड दगडफेक करत दहशत माजविली. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. दरम्यान, रात्री उशिरा करवीर आणि राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एका संशयित अज्ञाताला ताब्यात घेतले आहे. त्याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशीरापर्यंत सुरवात होते.

१६ मे रोजी देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ वसाहत येथे राहणाऱ्या दोघांवर हल्ल्या करण्यात आला होता. त्या रागातून हे कृत्य झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, रिंगरोड बोन्द्रेनगर येथे असणाऱ्या देसाई यांच्या घरावर मध्यरात्री अडीच-तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधून दगडफेक करत प्रचंड दहशद माजवली. त्यावेळी मोठ्याने आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक जागे झाले. बाहेर येऊन पाहिले असता, तिघे अज्ञात तरुण देसाई यांच्या घरावर दगडफेक करत असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ त्याबाबची माहिती कंट्रोल रूमला दिली. या हल्ल्यात बंगल्यासमोरील कुंड्या या रस्त्यावर येऊन फोडल्या आहेत. तर खिडक्यांच्या काचा फोडून चक्काचूर केला आहे. प्रचंड शिवीगाळ करत हल्लेखोरांनी दहशद माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर भोगम पार्क ठिकाणी असणाऱ्या किराणा स्टोअर्सची मोडतोड केली. दुकानाबाहेरील फरश्या उचकटून टाकून शेटरवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाणे-राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. पोलीसांनी एका अज्ञाताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

prashant_c

उञे गावचे वीज खांब पाण्याखाली ; नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

Archana Banage

कोल्हापूर : पं. स. सदस्य शाळेत अन् शाळेत नाही एकही शिक्षक

Archana Banage

होय; चीनने भारतीय सीमेवर कब्जा केला पण काँग्रेसच्या काळात

datta jadhav

12 तासात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

दान झालेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करणार : नगरसेवक किरण नकाते

Archana Banage