Vijay Setupati : विजय सेतुपतीने सोशल मीडिया साईटवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. या मध्ये तो नेहमीपेक्षा अधिक सडपातळ दिसत असून त्याने अल्पावधीतच वजन केमी केले आहे. विजयच्या या नव्या लुकवर त्याच्या चाहत्याकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी तो हा लुक खुपच प्रेरणादायी असल्याचे त्याने म्हटले आहे.
आपल्या अभिनयाने केवळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच नाही तर संपुर्ण भारतभरावर आपली छाप टाकणारा अभिनेता म्हणुन विजय सेतुपतीला ओळखले जाते. आपली तगडी फॅन फॉलोविंग असलेल्या विजयला अलीकडेच्या काळात त्याच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. पण यावर विजयने आपले वजन अल्पावधीतच कमी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने टाकलेल्या नवीन फोटोमध्ये आपले वजन बरेच कमी केल्याचे दाखवून दिले आहे. त्याचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विजयने त्याच्या फेसबुक पेजवर स्माईली सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये तो पांढऱ्या शर्टमध्ये दिसत असून मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तो पूर्वीपेक्षा सडपातळ दिसत आहे. विजय सेतुपती अलीकडेच काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तामिळ चित्रपट डीएसपीमध्ये दिसला.

