खानापूर शरीरसौष्ठव स्पर्धा : व्ही. बी. किरण उपविजेता : समर्थ गावडे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, खानापूर तालुका शरीरसौष्ठव संघटना व फ्लेक्स जीम यांच्या संयुक्त विद्यमाने मि. फ्लेक्स क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. फ्लेक्स क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. तर बेळगावच्या व्ही. बी. किरणला पहिले उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. समर्थ गावडेने उत्कृष्ट पोझर किताब पटकाविला.
खानापूर येथे आयोजित मि. फ्लेक्स राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार 55 ते 85 किलो वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे, 55 किलो गट – 1) आकाश निंगराणी बेळगाव 2) शशिधर उडपी 3) अभिषेक पाटील बेळगाव 4) नारायण जोशिलकर बेळगाव 5) रोहण अल्लूर बेळगाव. 60 किलो गट – 1) निर्मल कुमार शेट्टर 2) शेजल बाशा दावणगिरी 3) शिवा पाटील बेळगाव 4) उमेश गंगणे बेळगाव 5) बबन पोटे बेळगाव. 65 किलो गट – 1) रुषभ वशिष्ठ रायचूर 2) वासिम अबंपघाटी धारवाड 3) अरबाज वाटंगी बेळगाव 4) रोहण पालणकर बेळगाव 5) गणेश पाटील बेळगाव. 70 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव 2) शोहेब अली चिलबंध विजापूर 3) हैदरअली नदाफ बागलकोट 4) फ्रेंचीस नाईक उत्तर कन्नडा 5) लक्ष्मण गावडे बेळगाव. 75 किलो गट – 1) महेश गवळी बेळगाव 2) तपसकुमार नायक चित्रदुर्ग 3) विजय पाटील बेळगाव 4) सोमशेखर कारवी अफरोझ ताशिलदार बेळगाव 3) दयानंद निलजकर बेळगाव 4) प्रविण कणबरकर बेळगाव 5) कैश शेख बेळगाव. 85 किलो गट – 1) व्ही. बी. किरण बेळगाव 2) नित्यानंद कोटीयान उडपी 3) सनी मयेकर बेळगाव 4) गजानन काकतीकर बेळगाव 5) डेनिस मेंजिनिस बेळगाव. 85 किलो वरील गट – 1) विकास सूर्यवंशी बेळगाव 2) अखिब डोंगराखी बेळगाव 3) करामत अली बेळगाव. यांनी विजेतेपद पटकाविले. मि. फ्लेक्स क्लासिक किताबासाठी आकाश निंगराणी, निर्मल शेट्टर, रूषभ वशिष्ठ, प्रताप कालकुंद्रीकर, महेश गवळी, राजेश कोटीयान, व्ही. बी. किरण, विकास सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. या स्पर्धेत विकास सूर्यवंशी व व्ही. बी. किरण व राजेश कोटीयान यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. फ्लेक्स क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब पटकाविला. व्ही. बी. किरणने पहिले उपविजेतेपद पटकाविले. तर बेळगावच्या समर्थ गावडेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना बेंगळूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबळकर, आमदार डॉ. अंजली निंबाळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विकास सूर्यवंशी, उपविजेत्या व्ही. बी. किरण व उत्कृष्ट पोझर समर्थ गावडे यांना मानाचा किताब, चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्धण्णावर, एम. के. गुरव, वासुदेव साखळकर, एम. गंगाधर, नूर मुल्ला, प्रशांत सुगंधी, हेमंत हावळ, नलवडे यांनी काम पाहिले.