वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विक्रम के. दोराईस्वामी यांना ब्रिटनमधील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विदेश मंत्रालयाने मंगळवारी यासंबंधीची माहिती दिली आहे. विक्रम के. दोराईस्वामी हे 1992 च्या तुकडीचे भारतीय विदेश सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते बांगलादेशात भारताचे राजदूत म्हणून काम पाहत आहेत.
दोराईस्वामी यांना ब्रिटनमधील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले असून ते लवकरच याचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे. ब्रिटन अन् भारत यांच्यातील वृद्धींगत होणारे द्विपक्षीय संबंध पाहता अनुभवी मुत्सद्दी असलेले दोराईस्वामी यांची नियुक्ती महत्त्वाची मानण्यात येत आहे.