Tarun Bharat

अभिनेता विक्रम अत्यव्यस्त; उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम / चेन्नई

तमिळ अभिनेता विक्रमला शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाच्या टीझर लॉन्च कार्यक्रमाच्या काही तास अगोदर त्याला अत्यवस्थ वाटू लागले होते. त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, अत्यंतिक तापामुळे विक्रमला अस्वस्थ वाटल्यामुऴे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

“विक्रमला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले”, असा दावा करणाऱ्या काही बातम्यांना खोडून काढत विक्रमच्या टीममधील व्यक्तीने सांगितले की, “त्याला खूप ताप असून तो ठीक आता ठिक आहे. त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट कोब्राच्य़ा रिलीजची वाट पाहत असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल.

अभिनेला विक्रमचे या वर्षी दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. त्याचे दिग्दर्शक अजय ज्ञानमुथूचा ‘कोब्रा’ आणि मणिरत्नमचा ‘महाकाव्य पोनियिन सेल्वन’ प्रतिक्षेत आहेत. कोब्रा 11 ऑगस्ट रोजी पडद्यावर येण्याच्या तयारीत असून पोनियिन सेल्वन 30 सप्टेंबरच्या आसपास प्रदर्शित होईल.

Related Stories

आरोग्य विभाग परीक्षेत सावळा गोंधळ; वेळ संपली तरी विद्यार्थ्यांना पेपर मिळेना

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह आजपासून सुरू होणार

Sumit Tambekar

पंतप्रधानांचे आश्वासन म्हणजे लहान मुलाची समजूत काढण्यासारखे

datta jadhav

कोरोनाचा विस्फोट : जगात एका आठवड्यात सर्वाधिक 52 लाख बाधित

Rohan_P

पक्षातील हितचिंतकांकडूनच माझ्या राजीनाम्याची अफवा : अब्दुल सत्तार

prashant_c

50 रूग्णांची झाली ऍटीबॉडी टेस्ट

Patil_p
error: Content is protected !!