ऑनलाईन टीम/तरुण भारत
Indias First Privately Built Rocket : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation ) इस्रोने (ISRO) नवा इतिहास रचला आहे. आज भारताने पहिल्या खासगी रॉकेटच यशस्वी ( India’s First Privately Built Rocket ) केलं. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून या पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचं आहे. या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. निर्धारित लक्ष्यानुसार, हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे.
भारताचं पहिलं खासगी रॉकेट विक्रम-एस ( Vikram-S) आज सतीश धवन अंतराळ केंद्रांतून अवकाशात झेपावलं आहे. भारतासाठी हे फार मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे अवकाशात भारतासाठी नवा अध्याय सुरु झाला आहे. हे रॉकेट 80 ते 100 किलोमीटर उंचीवर पोहोचणार आहे. स्काय रूट एअरोस्पेस या कंपनीने या रॉकेट लाँचची तयारी केली आहे.
विक्रम एसच्या उड्डाणामुळे भारताचे नाव खासगी रॉकेट प्रक्षेपणात जगातील आघाडीच्या देशांमध्ये घेतलं जाईल. विक्रम एस रॉकेट लाँचिंगच्या मोहिमेत दोन भारतीय आणि एक परदेशी असे तीन पेलोड आहेत. यामध्ये चेन्नईतील स्टार्टअप स्पेस किड्झ, आंध्रप्रदेशातील एन स्पेस टेक आणि आर्मेनियम स्टार्टअप BazumQ स्पेस रिसर्च लॅब यांचा समावेश आहे.
भारताने अंतराळात आज मोठी झेप घेत नवा इतिहास रचला. श्रीहरीकोटामधून आज इसरोने पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण केलं. विक्रम-सबऑरबिटल रॉकेट असं या रॉकेटचं नाव आहे. स्काईरूट एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड या खासगी कंपनीनं या रॉकेटची निर्मिती केली आहे. 550 किमी वजनाचं हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे. आज उड्डाण केल्यानंतर हे रॉकेट सुमारे 100 किलोमीटरपर्यंत झेप घेईल आणि त्यानंतर समुद्रात कोसळेल.