नवी दिल्ली
सौर ऊर्जा क्षेत्रातील विक्रम सोलर यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अमेरिकन कंपनीकडून 350 मेगावॅट ऊर्जा प्रकल्पासाठी करार केला आहे. हा करार सोलर मॉडय़ूल्सच्या पुरवठय़ासाठी आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हा प्रकल्प अमेरिकेतील ऍरिझोना येथे आहे. या करारामुळे विक्रम सोलरची अमेरिकेतील उपस्थिती आणखी मजबूत होणार असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. विक्रम सोलरचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश चौधरी म्हणाले, ‘भारतात बनवलेल्या उच्च दर्जाच्या मॉडय़ूलची मागणी अमेरिकेत वेगाने वाढत आहे.