Vilawade High School annual prize distribution ceremony in high spirits
ग्रामीण भागातील विलवडे, सरमळे, कोनशी, भालावल, तांबोळी वाफोली या सहा गावासाठी विद्यार्थ्यासाठी गेली चार दशके माध्यमिक शिक्षणाची सुविधा देत असलेले राजा शिवाजी विद्यालय विलवडे पंचक्रोशी परिसराचे वैभव आहे. त्यामुळे या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना घारे परब तसेच माजी उपसभापती विनायक दळवी या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी उपसभापती कृष्णा सावंत, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, संस्था खजिनदार चंद्रकांत दळवी, डेगवे माजी उपसरपंच मधुकर देसाई, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, माजी सरपंच अभिलाष देसाई, बावळाट सरपंच सोनाली परब, कोनशी सरपंच साधना शेट्ये, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, भालावल उपसरपंच अर्जून परब, विलवडे उपसरपंच विनायक दळवी, सुरेश कदम, राजाराम दळवी गोविंद तांबे, माजी मुख्याध्यापक एन एल सावंत, विद्या मसुरकर, सोनू दळवी हरिश्चंद्र दळवी, सहदेव दळवी, सुरेश सावंत, प्रदीप दळवी, परेश धरणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, अपर्णा दळवी, शिल्पा धरणे, स्नेहा दळवी, नारायण दळवी सानिका दळवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, सूत्रसंचालन वनसिंग पाडवी, अहवाल वाचन मुकुंद कांबळे तर आभार सुहास बांदेकर यांनी मानले.
ओटवणे / प्रतिनिधी