Tarun Bharat

छत्तीसगडमधील युटय़ूबर्सचे गाव

Advertisements

प्रत्येकजण व्हिडिओद्वारे करतोय मोठी कमाई

छत्तीसगडच्या रायपूरमधीर तुसली गाव हे युटय़ूबर्सचे प्रमुख केंद्र ठरले आहे. या गावात मोठय़ा संख्येत स्थानिक लोक ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करत आहेत. येथील लोक या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला करियरची संधी म्हणून पाहत आहेत. या गावात सुमारे 40 युटय़ूब चॅनेल्स असून एंटरटेन्मेंटसह हे युटय़ूबर्स शिक्षणाशी निगडित कंटेंट देखील तयार करतात.

तुसली गावातील युटय़ूब संस्कृतीची सुरुवात ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा या  दोन मित्रांनी केली होती. लवकरच याचे अनुकरण गावातील अन्य लोक देखील करू लागले. युटय़ूबमध्ये करियर सुरू करण्यासाठी ज्ञानेंद्र यांनी स्टेट बँकेतील तर जय वर्मा यांनी शिक्षकाची नोकरी सोडली होती.

युटय़ूबमध्ये करियन

ज्ञानेंद्र यांनी एसबीआयमध्ये एक नेटवर्क इंजिनियर म्हणून काम केले होते. तेथे काम करत असताना ते युटय़ूब व्हिडिओ पाहायचे. मी 9-5 या वेळेतील स्वतःच्या नोकरीबद्दल समाधानी नव्हतो. याचमुळे नोकरी सोडून युटय़ूबची वाट पकडली. आतापर्यंत आम्ही सुमारे 250 व्हिडिओ तयार केले असून लाखो सब्सक्रायबर्स मिळविले असल्याचे ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

40 टक्के युटय़ूबशी जोडले गेलेले

पूर्वी आम्हाला युटय़ूबसाठी कंटेंट तयार करताना संकोच वाटायचा आणि सार्वजनिक ठिकाणी चित्रण करणे जमत नव्हते. परंतु आम्ही आता हे सहजपणे करत आहोत. आता या गावातील जवळपास सर्वच लोक युटय़ूबसाठी व्हिडिओ तयार करतात आणि कमाई करतात. गावात सुमारे 3 हजार लोक असून यातील 40 टक्के लोक युटय़ूबशी जोडले गेलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

चांगली कमाई

आम्हाला पाहून लोकांनी युटय़ूबसाठी व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. टिकटॉक अन् आता रील्स देखील आम्ही व्हिडिओ तयार करत आहोत. आता आम्ही महिन्याकाठी 30-35 हजार रुपये कमावत असल्याचे जय वर्मा यांनी सांगितले आहे. नक्षलप्रभावित राज्यात युटय़ूब मुलींना सशक्त करण्याचे एक माध्यम असल्याचे मत युटय़ूबर पिंकी साहू यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

दगडूशेठ मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना

prashant_c

एकाच वेळी नऊ महिलांशी विवाह

Patil_p

कोणतीही लक्षणे नसताना ‘ती’ 19 वेळा कोरोना पॉझिटिव्ह

prashant_c

जगातील सर्वात मोठा बर्गर

Patil_p

मध गोळा करणाऱया मुंग्या

Patil_p

प्रदुषणाची धास्ती

Patil_p
error: Content is protected !!