गारगोटी /प्रतिनिधी
येथील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या वेगवेगळ्या नोंदी करण्यासाठी ग्रामसेवकास पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अमृत गणपती देसाई (रा. गडहिंग्लज) असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
गारगोटी कोल्हापूर रोड वरील गोंजारी हॉस्पिटल समोरील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या सेपरेट नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडून चालढकल सुरू होती. ग्रामसेवक अमृत देसाई याने सयाजी देसाई यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून वेळ काढू पणाचे धोरण अवलंबिले होते. नोंदणीकरिता २० लाख रुपये किंवा कमर्शियल गाळा देण्याची मागणी केली होती. तडजोडी अंती हा व्यवहार १४ लाख रुपयांना ठरला होता. सयाजी देसाई यांनी याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देऊन सापळा रचला होता. आज दुपारच्या सुमारास सयाजी कॉम्प्लेक्स मधील ऑफिसमध्ये ग्रामसेवक अमृत देसाई यास पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
गारगोटी ग्रामपंचायतीचे ग्रामविकासअधिकारी अमूत देसाई याला पाच लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद केले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कूंभार, पो.हे.कॉ शरद पोरे, पो.ना. विकास माने, पो.ना सूनिल घोसाळकर, पो.कॉ रूपेश माने यांनी केली.
ग्रामसेवक देसाई चार पाच महिन्यापुर्वी गारगोटी ग्रामपंचायत मध्ये हजर झाले होते.येणार्या प्रत्येकाला कायदाचा बडगा दाखवुन आपण भष्ट्राचार खपवून घेत नसल्याचे प्रबोधन करत असत त्यामुळे गारगोटीकर ग्रामस्थ देसाई च्या कारभाराविषयी तीव्र नाराज होते. येईल त्यांचे प्रबोधन करीत होते त्यांच्या भाषणबाजीतून अगदी प्रसारमाध्यमे सुध्दा सुटली नाहीत. सदरचा अर्थपूर्ण व्यवहार करताना ग्रामपंचायतमधील कुठलाही घटक त्यांनी मध्यस्थ म्हणून घेतला नाही थेट स्वतच व्यवहार करुन जाळ्यात फसले.