Tarun Bharat

३ ऑगस्टला पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला; कार्यकर्त्याचा दावा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती (Accident) निधन झालं आहे. त्यांचा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. तर विशेषत: विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर जवळपास तासभर तिथे मदत पोहोचली नाही, असा देखील दावा केला जात असून त्यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांची वेगवेगळी पथके तपास करत असताना आता अजून एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. हा दावा विनायक मेटेंसोबत काही दिवसांपूर्वी बीड ते पुणे प्रवास केलेल्या एका कार्यकर्त्याने केला असून त्यावरून मेटेंच्या अपघातामागचं गूढ अधिकच वाढलं आहे.

दरम्यान, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याने खळबळजनक दावा केलाय. एका आयशर ट्रकने काही दिवसांपूर्वी पुण्यात विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. तसेच, हा ट्रक मेटे यांच्या गाडीला कट मारण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याने हा दावा केला आहे.

“३ ऑगस्ट रोजी पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा २ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. त्यात एक अर्टिगा कार होती आणि दुसरा आयशर ट्रक होता. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून पाहूया. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर गाडी होती. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता. तीन ऑगस्टला पुण्याच्या अलिकडे शिक्रापूरजवळ हा प्रकार घडला”, अशी माहिती अण्णासाहेब वायकर (Annasaheb Waykar) यांनी दिली.

हे ही वाचा : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नेहमीचा चालक सुट्टीवर?
दरम्यान, विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या दिवशी अर्थात १४ ऑगस्ट रोजी त्यांचा नेहमीचा चालक समाधान वाघमोडे हा सुट्टीवर असल्याची माहिती देखील या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. समाधान वाघमोडेच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे तो गावी गेला होता. त्याच्या जागी एकनाथ कदम याला त्या दिवशी बोलावण्यात आलं होतं.

तपासासाठी पोलिसांची आठ पथके

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून त्यासाठी फॉरेन्सिकसह आठ पथके नेमण्यात आली आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली. वाहनचालक एकनाथ कदम (Eknath Kadam) यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. या अपघातात एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ इजा झाल्याचे सांगण्यात येते. त्यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला ; सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

Related Stories

… मुख्यमंत्रीच स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकेल नाहीत

Rohan_P

मुंबई : सीएसएमटी स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा; पोलिसांची कसून तपासणी

Rohan_P

“बळीराजावर जलसमाधी घेण्याची वेळ येऊ नये”

Abhijeet Shinde

सांगा सांगा फुटपाथ कोणाच्या मालकीचे?

Patil_p

संजय राऊत माझे 25 लाख कधी परत करणार?

datta jadhav

राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेंगळूर दौऱ्यावर

Nilkanth Sonar
error: Content is protected !!