शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदार आणि भाजप यांच्यात पुढील काही दिवसांत तुंबळ युद्ध पाहायला मिळणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसतील असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलाय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसतेय. केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पोपट केलाय, असा घणाघात राऊतांनी केलाय.एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही.त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत अशी टाकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा- नवीन सरकार गोंधळलेलेचं, मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटतेयं-सुप्रिया सुळे
पुढे बोलताना ते म्हणाले, बंडखोर आमदारांच्या तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर 100 टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार. मंत्रिपद न मिळाल्यास अनेक आमदार मानगुटीवर बसणार आहेत. आणि शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल. असेही ते म्हणाले.


previous post