Tarun Bharat

विद्युत वाहिन्यांवरील वेली धोकादायक

प्रतिनिधी /बेळगाव

काँग्रेसरोड येथील मराठा कॉलनी कॉर्नरच्या विद्युत वाहिन्यांवर वेली पसरल्या असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. हेस्कॉम कर्मचाऱयांच्या दुर्लक्षामुळे शहरातील बऱयाचशा भागात असे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांनी यामध्ये लक्ष घालून या वाहिन्या वेलीमुक्त कराव्यात.

दोन विद्युत वाहिन्या एकमेकांच्या संपर्कात आल्या तर शॉर्टसर्किट होण्याची शक्मयता असते. काही ठिकाणी विद्युत खांबांवर गेलेल्या वेली वाहिन्यांवरही पसरल्या आहेत. बऱयाचवेळा बाजुच्या विद्युत वाहिन्यांवरही या वेली पसरल्या जात असून यामुळे धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हेस्कॉम कर्मचाऱयांनी या वेली काढणे गरजेचे आहे. परंतु कर्मचाऱयांच्या दुर्लक्षपणामुळे बऱयाच ठिकाणी वेलींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मराठा कॉलनी कॉर्नर येथे पॅनल बॉक्सवरून वेली आता विद्युत वाहिन्यांवर पसरल्या आहेत. शहराच्या महत्त्वाच्या परिसरात जर अशी परिस्थिती असेल तर उर्वरित शहरात काय स्थिती असेल, याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हेस्कॉम प्रशासनाने शहराच्या सर्वच भागातील विद्युत वाहिन्यांवर चढलेल्या वेली दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Amit Kulkarni

निपाणीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

Patil_p

उसाला तुरे फुटल्याने उत्पादनात घट

Patil_p

परिवहन कर्मचाऱयांच्या संपामुळे खानापूर आगारात शुकशुकाट

Patil_p

सर्व्हरडाऊनमुळे आयटीआय विद्यार्थी परीक्षेला मुकले

Amit Kulkarni

मंगाई मंदीर परिसरात ड्रेनेजचे पाणी

Patil_p