Tarun Bharat

विनोद कांबळी आर्थिक अडचणीत!

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या साथीने क्रिकेट पदार्पण नोंदवलेल्या विनोद कांबळीला सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून मार्ग काढावा लागत असून निवृत्त खेळाडूंना दिल्या जाणाऱया 30 हजार रुपयांच्या निवृत्ती वेतनावरच त्याची कशीबशी गुजराण सुरु आहे. कधी काळी कोटय़वधीचा धनी असलेल्या विनोद कांबळीची ही आर्थिक दुरावस्था एका सायंदैनिकाने दिलेल्या वृत्तानंतर प्रकाशझोतात आली.

18 जानेवारी 1972 रोजी जन्मलेल्या विनोद कांबळीने शालेय क्रिकेट गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जोरदार सुरुवात केली होती. गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत षटकारांच्या आतषबाजीसह लाखो रुपयांची कमाई साहजिक होती. अगदी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर देखील सचिनपेक्षा कांबळीची गुणवत्ता आपल्याला अधिक भावते, असे जाहीरपणे नमूद केले होते. पण, नंतर एकीकडे जिथे सचिन यशाच्या शिखरावर पोहोचला, तेथे दुसरीकडे, विनोद कांबळी अक्षरशः रसातळाला फेकला गेला. सध्या मुंबईत विनोद कांबळीचे स्वतःचे घर असले तरी महिन्याकाठी मिळणाऱया 30 हजार रुपये निवृत्तीवेतनावर त्याची सर्व भिस्त आहे.

विनोद कांबळीने भारतातर्फे 104 वनडे व 17 कसोटी सामने खेळले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3561 धावांचे योगदान दिले. बऱयाच वादंगात राहिलेल्या विनोद कांबळीने संघातून बाहेर फेकले गेल्यानंतर समालोचन, जाहिराती केल्या. तसेच चित्रपटात अभिनयही केला. पण, कोरोनानंतर अनेक समीकरणे बदलली आणि याचा विनोद कांबळीला मोठा फटका बसला.

‘सचिनला माझ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. पण, मी त्याच्याकडे मदत मागू इच्छित नाही. त्याने तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या माध्यमातून पूर्वी माझी मदत केली आहे’, असे विनोद कांबळी याप्रसंगी म्हणाला.

Related Stories

यू मुम्बा-हरियाणा स्टीलर्स रोमांचक लढत टाय

Patil_p

बेंगळूर टॉरपेडोज-कालिकत हिरोज आज लढत

Patil_p

मुख्य भिस्त अष्टपैलू खेळाडूंवरच!

Patil_p

प्रो कबड्डी लीगची अंतिम लढत 25 फेब्रुवारीस

Patil_p

वेळापत्रकाकडे आयसीसीचे दुर्लक्ष ः बेन स्टोक्सची टीका

Patil_p

हॉलंडचा व्हर्स्टेपन सराव शर्यतीत आघाडीवर

Patil_p