ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. तरीही जाणीवपूर्वक कसबा मतदारसंघात भाजपचे झेंडे झळकत आहेत. भाजपकडून आचारसंहितेचा भंग होत असतानाही प्रशासनाने मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या दोन्ही जागांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून, सर्व पक्ष आपले उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असतानाही भाजपने या मतदारसंघात पक्षाचे झेंडे लावले आहेत. अद्याप प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अधिक वाचा : ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांवर गोळीबार; प्रकृती गंभीर