Tarun Bharat

VIP चे मुकेश साहनी यांना मोठा धक्का

तीनही आमदार भाजपामध्ये दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बिहार विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये सुरू असलेली धुसफूस अधिक तीव्र होताना दिसत आहे. विकसनशील इंसान पार्टीचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश साहनी यांना बुधवारी मोठा झटका बसला. त्यांच्या पक्षाच्या तीनही आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राजू सिंह, मिश्रीलाल आणि स्वर्ण सिंह यांनी विकास इंसान अशी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांची नावे आहेत.

दरम्यान,विकसनशील इंसान पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर त्यांना बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनीही तीन आमदारांना मान्यता देखील दिली. बिहार विधानसभेत VIP चे फक्त तीन आमदार होते, तसेच मुकेश साहनी स्वतः विधानपरिषद सदस्य आहेत.

या तिन्ही आमदारांनी सभापतींची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. व्हीआयपीकडे फक्त हे 3 आमदार आहेत. साहनी यांचा विधानपरिषद पदाचा कार्यकाळ काही आठवड्यात पूर्ण होत आहे, त्यामुळे तीन आमदारांचे पक्षांतर हा साहनी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान साहनी यांनी त्यांच्या नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप त्यांच्यावर नाराज होता. दरम्यान, बुधवारी व्हीआयपी पक्षाचे आमदार राजू सिंह, स्वर्ण सिंह आणि मिश्रीलाल यादव यांनी सभापतींची भेट घेतली.

Related Stories

सीबीएसई दहावी परीक्षा परिणाम घोषित

Patil_p

पेटीएमच्या समभागांनी गाठली नीच्चांकी

Patil_p

अभिमानास्पद! महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांना शौर्य पुरस्कार

prashant_c

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात? मलिकांचं नवं ट्विट…

datta jadhav

सहा दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलचा भडका

Patil_p

फिनलँडमध्ये 16 वर्षीय मुलगी एक दिवसासाठी पंतप्रधान

datta jadhav
error: Content is protected !!