Tarun Bharat

विराजस – शिवानी लवकरच अडकणार विवाहबंधनात

तरुणभारत ऑनलाइन टीम

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असून पुढील महिन्यात ते लग्न करणार आहेत. विराजस आणि शिवानी यांची 6 जानेवारीला एंगेजमेंट झाली आहे.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार शिवानी आणि विराजस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नाची तारीख 7 मे आहे. लग्नासाठी शिवानी आणि विराजच्या मित्र आणि सहकाऱ्यांनाच आमंत्रित केले जाईल.याच दिवशी रात्री 7 ते 9 या वेळेत विराजस आणि शिवानीच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. जरी या जोडप्याने सोशल मीडियावर कधीही त्यांच्या नात्याची उघडपणे कबुली दिली नसली तरी त्यांचे अनेक त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.आणि यावर अनेक चाहते कंमेंट देखील करत असतात. म्हणूनच विराजस-शिवानीच्या लग्नासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत.

Related Stories

ED कारवाईपासून संरक्षण मिळावे; अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Archana Banage

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर ‘असा’ साजरा होणार ‘शिवराज्याभिषेक दिन’

Tousif Mujawar

7 ऑक्टोबरला झळकणार ‘गुड बाय’

Patil_p

आमच्याकडे तक्रारदारच गायब; पण खटला सुरू आहे

datta jadhav

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत जाहीर

Archana Banage

सोलापूर : बार्शीत विनापरवाना दुतर्फा वृक्ष लागवड, नगरपरिषदेच्यावतीने गुन्हा दाखल

Archana Banage