Tarun Bharat

विराट, रोहित, अश्विनचे पहिल्या दहातील स्थान कायम

वृत्तसंस्था /दुबई

आयसीसीच्या पुरूषांच्या कसोटी मानांकनात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी पहिल्या दहा खेळाडूंतील स्थान कायम राखले आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश आणि लंका यांच्यातील अनिर्णित राहिलेल्या पहिल्या कसोटीत दर्जेदार कामगिरी करणाऱया लिटॉन दास आणि अँजेलो मॅथ्यूज यांना ताज्या कसोटी मानांकनात अधिक लाभ मिळाला आहे.

Advertisements

कसोटी क्रिकेट फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या लाबुशानेने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. या यादीत भारताचा विराट कोहली आठव्या तर रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 901 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले असून भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱया तर बुमराह तिसऱया स्थानावर आहे. कसोटी क्रिकेट अष्टपैलू मानांकन यादीत भारताचा रविंद्र जडेजा अग्रस्थानावर आहे. लंकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज लिटॉन दासने कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत 17 वे तर अँजेलो मॅथ्यूजने 21 वे स्थान मिळविले आहे.

Related Stories

आशिया चषक महिला फुटबॉल पात्रता स्पर्धेचा ड्रॉ लांबणीवर

Patil_p

रशियाच्या पुतिनसेव्हाचे दुसरे जेतेपद

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत शरापोव्हाला वाईल्डकार्ड प्रवेश

Patil_p

बलवीर सिंग सिनियर यांना हार्ट ऍटॅक, प्रकृती चिंताजनक

Patil_p

अष्टपैलू सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

Patil_p

लॉर्ड्सवरील पहिली कसोटी रंगतदार वळणावर

Patil_p
error: Content is protected !!