मुंबई
आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सीईओपदी विशाखा मुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या आधी विशाखा मुळे या आयसीआयसीआय बँकेत सेवा बजावत होत्या. येत्या 1 जूनपासून त्या सीईओ पदाचा कारभार प्रत्यक्षात सांभाळणार आहेत. आदित्य बिर्लाच्या मंडळावर सदस्य होणाऱया विशाखा मुळे या पहिल्या महिला आहेत.