Tarun Bharat

Visakhapatnam : विशाखापट्टणम आंध्रप्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री जगन रेड्डी यांची घोषणा

या पुढे विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असल्याची घोषणा मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केली आहे. या आधी कृष्णा नदीच्या काठावर असलेले आणि प्राचिन वारसा असलेले अमरावती याची घोषणा झाली होती. पण ते रद्दबातल करून विशाखापट्टणमला नवीन मान्यता देण्यात आली.

पुर्वाश्रमीच्या आंध्रप्रेदश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर हैद्राबाद हे महत्वाचे शहर तेलंगणाला राजधानी म्हणून लाभले. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने आपली राजधानी अमरावती घोषित करून त्यांच्या नव्या बांधणीसाठी विषेश प्रयत्न केले. अमरावती मध्ये पाय़ाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणुक करण्यात आली होती. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारने 2015 मध्ये अमरावतीला राज्याची राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 33,000 एकर जमीन संपादित केली होती.

सीएम जगन मोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय राजनैतिक बैठकीत बोलताना या संदर्भातील घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करत असून ती काही दिवसात आमची राजधानी असेल. मी विझागला देखील स्थलांतरित होणार आहे.” आंध्र प्रदेशमध्ये व्यवसाय करणे किती सोपे आहे हे उद्योगपतींनी नक्कीच एकदा येऊन पाहिली पाहीजे असेही ते म्हणाले.

Related Stories

‘व्होडाफोन समूहा’चा भारताला दणका

Patil_p

खलिस्तानी समर्थकांचा ब्रिटन-अमेरिकेत गोंधळ

Patil_p

‘मिग’ दुर्घटनेत ग्रुप कॅप्टन हुतात्मा

Patil_p

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार भामा-आसखेडचे लोकार्पण

Tousif Mujawar

अमृता फडणवीसांचा मलिकांना नोटीस देऊन कारवाईचाही इशारा

Abhijeet Khandekar

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार

datta jadhav