तरुणभारत ऑनलाइन टीम
‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता विशाल निकम हा सौंदर्यामुले फार चर्चेत आला होता.त्याने सौंदर्यासोबतच्या नात्याची घोषणाही केली होती.सौंदर्या कोण आहे?कशीआहे ?असे प्रश्न विशालला त्याचे चाहते नेहमी विचारात असतात. पण अद्यापही सौंदर्या समोर आली नाही.मात्र आता विशाल आणि सौंदर्या यांचे अधिकृतपणे ब्रेकअप झाले आहे.
बिग बॉस मराठी 3 नंतर आमचं नातं टिकू शकलं नाही असं विशालने सांगितले आहे.”माझं सौंदर्यासोबत ब्रेकअप झालं आहे. लोक म्हणतील की मी तिच्यासोबतच्या माझ्या नात्याबद्दल खोटं बोलत होतो पण ते खरं होतं. सौंदर्या होती पण आता मी सिंगल आहे आणि सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.असं विशालने ई टाइम्स शी बोलताना अंगितलं आहे.मी जिथे जातो तिथे लोक मला सौंदर्याबद्दल विचारतात आणि म्हणूनच मी सर्वांना हे सांगण्याचा निर्णय घेतला की आता तिथे काहीही नाही. हे माझ्यासाठी कठीण आहे. मला माहित आहे की लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि मला असे वाटू शकते. पुढे जाणे कठीण आहे पण आता मी माझ्या आयुष्यात आनंदाने पुढे जात आहे.असही विशाल म्हणाला आहे.