सांगली प्रतिनिधी
विश्रामबाग उड्डाणपुलावर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ज्युपिटर या दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यानंतर तात्काळ याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली. पण ही आग इतकी मोठी होती की या आगीत दुचाकीचे फार मोठे नुकसान झाले आहे. ही दुचाकी शिवराज माळी यांच्या मालकीची आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विश्रामबाग उड्डाणपुलाच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी एक दुचाकी अचानक पेटली. त्यामुळे इतर वाहनधारकांना तात्काळ बाजूला करण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली पण या दुचाकीला लागलेली आग भडकतच गेली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी सुनील माळी, विकास घाडगे, रामचंद्र चव्हाण यांनी तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळविले. पण तोपर्यंत या दुचाकीचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात नेंद करण्यात आली आहे.