Tarun Bharat

संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि…; विश्‍वजित कदम

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सागंली: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. नाही तर आम्हाला विरोधी बाकावर बसावं लागलं असतं,असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत (Sanjay Raut)असल्याचा मंत्री विश्वजीत कदम यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. सांगलीच्या पलूस येथील आमणापूर येथील जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते.

पलूस तालुक्यातील आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना महाविकास आघाडी कशी सत्तेवर आली यावर भाष्य केले.

मंत्री कदम म्हणाले, विधानसभा निवडणुकावेळी प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळी आपण लोकांना कानात सांगत होतो मला निवडून दिले की कदाचित मला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागेल सत्ता काय आमची येत नाही. पण, निवडणूक झाली आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले ते बरं झालं. त्यामुळे राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आलं असा गुपित मंत्री कदम यांनी सांगितले.

Related Stories

”फडणवीस दिल्लीत जाऊन बसले तर जास्त मदत करु शकतात, पण दुर्दैवाने पोलीस स्टेशनला गेले”

Abhijeet Shinde

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे शुद्धिकरण; नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

Abhijeet Shinde

यशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार : खासदार संजयकाका पाटील

Abhijeet Shinde

राज्यपालांना सही करण्याचा प्रॉब्लेम: संजय राऊत

Abhijeet Shinde

सांगली : कोयना धरणावर मिळाला तब्बल नऊ फुटी अजगर

Abhijeet Shinde

मिरजेतील डॉक्टराला 50 लाखांचा गंडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!