वार्ताहर /मच्छे
श्री विश्वकर्मा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवार दि. 19 रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे जाऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर सुतार-लोहार समाजाच्या समस्या व अडचणी निवेदनाद्वारे मांडल्या.
निवेदनामध्ये समाजाला कोणत्या प्रकारे आर्थिक सहाय्य व्हावे व समाजाची प्रगती व्हावी यासाठी मुद्दे मांडण्यात आले. तसेच समाजातील मुले कशाप्रकारे शैक्षणिक
स्कॉलरशिपपासून वंचित आहेत. तसेच बेघरांसाठी आश्रय योजनतील घरे मिळावीत, जातीच्या दाखल्यावर हिंदू मराठा असे नोंद असल्यामुळे विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या ज्या काही सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे आपल्या जातीच्या दाखल्यावर सुधारणा करून हिंदू पांचाळ अशी नोंद करून मिळावी, या प्रकारच्या मागण्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या मागण्या मान्य करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर, हनुमंत लोहार, राजू सुतार, राजेश लोहार, अरुण देसुरकर, संदीप मंडोळकर, जोतिबा लोहार व पदाधिकारी उपस्थित होते.
जात दाखला सुधारणा मागणीला यश
जातीच्या दाखल्यावर हिंदू मराठा असे नोंद असल्यामुळे विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या ज्या काही सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या या समाजातील लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे याची दखल घेऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तात्काळ जातीच्या दाखल्यात सुधारणा करून देण्याचे आदेश दिले आहेत.