Tarun Bharat

मराठी गीतांमधून संस्कृतीचे दर्शन

भाषा प्रेमी मंडळ, बेळगावतर्फे रसिक रंजन प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

अजरामर मराठी गीतांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली आहे. या गीतांमधून संस्कृतीचे दर्शन घडत गेले. नांदी, गवळणी, अभंग, ओवी, चित्रपट गीत यामधून मराठी संस्कृती अधिकच बळकट झाली. आजही ती मराठी चित्रपटगीते संस्कृतीचा पाया म्हणून ओळखली जातात. अशाच अजरामर गीतांची शनिवारी बेळगावमध्ये मैफल रंगली.

भाषा प्रेमी मंडळ, बेळगावतर्फे रसिक रंजन प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मराठी गीत व संगीताचा कार्यक्रम शनिवारी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात निलकंठ नटराज महेश्वर या नांदीने झाली. श्रीरंगा कमलाकांता ही शाहिरांची गवळण सादर करून श्रीवत्स हुद्दार यांनी उपस्थितांची मने जिंकली. काजल धामणेकर हिने सादर केलेल्या खेड्यामधले घर कौलारू या गीताने ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. त्यानंतर लपविलास हिरवा चाफा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, लाजून हासने अन् हासून ते पाहणे, शुक्रतारा मंद वारा, मनसुद्ध तुझ गोष्ट हाय, रम्य ही स्वर्गाहून लंका यासह इतर एकाहून एक सरस गीते सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. प्रा. अनिल चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

बृहन्महाराष्ट्र नवी दिल्ली प्रायोजित विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सुमित्रा महाजन व किरण ठाकुर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले. यावेळी सुमित्रा महाजन यांनी संवाद साधला. यावेळी राज्य मराठी विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

जयभारत फौंडेशनची कॅन्टोन्मेंटला मदत

Patil_p

सिव्हिलच्या सुरक्षेची जबाबदारी आता पोलिसांवर

Amit Kulkarni

एपीएमसीतील व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन

Tousif Mujawar

खानापूर तालुक्याच्या विकासकामात कोणतेही राजकारण नको

Amit Kulkarni

गटारीमधील साहित्य गेले वाहून

Amit Kulkarni

निजगुणानंद स्वामीजींसह पुरोगामींना धमकीचे पत्र

Patil_p