Tarun Bharat

अतिरिक्त पोलीस महासंचालकांची कोगनोळी नाक्याला भेट

कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आवाहन : पोलीस अधिकाऱयांना सूचना

वार्ताहर /कोगनोळी

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱया कोगनोळी (ता. निपाणी) येथे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी मंगळवारी सकाळी भेट देऊन कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांचे कर्नाटक पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गेल्या 8 दिवसामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केल्याने महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंतरराज्य बसवाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती, ती आता पूर्ववत सुरू झाली आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा, यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी कोगनोळी येथे आंतरराज्य सीमेवर येऊन पाहणी करून संबंधित पोलीस अधिकाऱयांना योग्य त्या सूचना केल्या.

याप्रसंगी बोलताना अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार म्हणाले, कर्नाटक सीमाभागामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात येऊन कोणीही कोणत्याही प्रकारची दंगामस्ती करू नये, शासनाच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान करू नये, सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, सीमाभागातील नागरिकांना पोलिसांचे चांगल्याप्रकारे सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतिशकुमार, पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगया, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी, पोलीस उपाधीक्षक बसवराज यलगार, पोलीस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

खानापूर-रामनगर मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Amit Kulkarni

कणकुंबीजवळ 6 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

Amit Kulkarni

गृहशोभा प्रदर्शनाचे उद्घाटन

Omkar B

बेळगावात अडकलेले परप्रांतीय हुबळीमार्गे स्वगृही

Patil_p

गोगटे सर्कल येथे अडकताहेत वाहने

Patil_p

निपाणीतून महाराष्ट्र बससेवा थांबविली

Patil_p