वार्ताहर /बैलहोंगल
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आएएस अधिकारी, केंद्र सरकारचे कार्यदर्शी, राष्ट्रीय पर्जन्य प्राधिकारणाचे सीईओ व शेतकरी उत्पन्न दुहेरी समितीचे चेअरमन डॉ. अशोक दळवाई यांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबासह यल्लम्मा डोंगराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी यल्लम्मा मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी एस. बी. दोड्डगौडर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानचे अधीक्षक अरविंद माळगे, आर. एस. सवदत्ती, सी. एन. कुलकर्णी. पुजारी विश्वनाथगौड रेणकीगौड्र, गणपतीगौड्र चन्नपगौड्र, जी. पी. तुप्पद व कर्मचारी उपस्थित होते.