प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-गोवा रेल्वेमार्गावरील पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्य व फेसाळणारा दूधसागर धबधबा पाहण्यासाठी रेल्वेने नवी योजना आखली आहे. एर्नाकुलम-पुणे या एक्स्प्रेसला पारदर्शक असे विस्टाडोम कोच लावण्याचा प्रयत्न नैर्त्रुत्य रेल्वेने सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांना पश्चिम घाटाचे पावसाळी सौंदर्य विस्टाडोम कोचमधून पाहता येणार आहे.
एर्नाकुलम-पुणे ही पूर्णा एक्स्प्रेस मंगळूर, कारवार, मडगाव, दूधसागर, लोंढा, बेळगाव मार्गे धावते. कोकण किनारपट्टीसोबत पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहणाऱयांना ही एक्स्प्रेस महत्त्वाची ठरते. त्यामुळेच नैर्त्रुत्य रेल्वेने या एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच बसविण्याचा विचार सुरू केला आहे. पावसाळय़ाच्या दिवसात पश्चिम घाटाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. पारदर्शक काचा असणाऱया विस्टाडोम कोचमधून निसर्ग सौंदर्य पाहता येते. या डब्यात काचेच्या रुंद खिडक्मया, एलईडी लाईट, पुशबॅक आसनाची व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना ती अधिक लाभदायक ठरते.
दूधसागर धबधब्याला शेकडो पर्यटक जात असतात. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेमधून येता-जाता हा धबधबा पहावा लागत आहे. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने विस्टाडोम कोच जोडण्याचा विचार सुरू केला आहे.