Tarun Bharat

विट्याची नाथाष्टमीनिमित्त नयनरम्य आतषबाजी

विटा प्रतिनिधी

येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात पार पडली. रविवारी आंबिल गाड्यांच्या मिरवणूका झाल्यानंतर रात्री छबीना मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी करण्यात आलेल्या शोभेच्या आतषबाजीने आसमंत उजळला. विविध आकारातील शोभेच्या दारुकामाने आष्टमीत आकर्षक रंग भरले. उत्ती, बेंजो पथक यांच्यासह निघालेल्या छबिना मिरवणूकीत ‘नाथ बाबाच्या नावानं चांगभलंऽऽ च्या जयघोषात गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.

शनिवारी रात्री श्रींचा जन्मकाळ झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित ठोते. रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी श्रीनाथ मंदीरात रांग लागली होती. येथील नाथाष्टमीच्या निमीत्ताने शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी आमढीच्या गाड्यांची मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी शहराच्या चारही बाजूंनी सजवलेल्या बैलगाड्यांचे जथ्थे सवाद्य मिरवणूकीने नाथाच्या दर्शनासाठी रवाना झाले. गुलालाची उधळण करीत युवक या मिरवणूकीत सहभागी झाले होते.

रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उभ्या पेठेतील हनुमान मंदीरापासून छबीन्याच्या मुख्य मिरवणूकीस प्रारंभ झाला. भैरवनाथ, रेवणसिद्धनाथ, म्हसवड सिद्धनाथ आणि भैरोबा देवांच्या पालख्या मिरवणूकीत सहभागी होत्या. मिरवणूकीच्या अग्रभागी हत्ती आणि बँड पथक होते. सवाद्य मिरवणूक गांधी चौकातील दगडी पाण्याच्या टाकीजवळून शिवाजी चौकात आली. या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नाथ बाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’ च्या जयघोषात गुलालाची मुक्त उधळण सुरू होती.

विट्याची नाथाष्टमी शोभेच्या दारूच्या नयनरम्य आतिषबाजीसाठी प्रसिद्ध आहे. हौशी लोक शोभेची दारू उडवतात गुलालाची मुक्त उधळण आणि नावांच्या नावाचा गजर यामुळे दुमदुमलेल्या आसमंतात फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी असे वातावरण यावेळी दिसून येत होते. मिरवणूकी वेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता. एकूणच दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर विट्याच्या नाथाष्टमीत कमालीचा उत्साह दिसून येत होता. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छबिना मिरवणूक आल्यानंतर झालेली गर्दी लक्षणिय होती. युवकांचा उत्साह, अबालबुद्धांची उपस्थिती आणि उत्साही वातावरणात विट्याची आष्टमी सुरू झाली.

Related Stories

कर्नाटकने सोडले जत तालुक्यात पाणी, तिकोंडी तलाव एका दिवसात ओव्हरफ्लो

Archana Banage

सांगली : हरिपूर पर्यटकांचे नवे आकर्षण

Archana Banage

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय – डॉ. अर्चना पाटील

Archana Banage

कोरोना रूग्णांसाठी शंभर बेडची सोय करू – अण्णा डांगे

Archana Banage

पुरग्रस्तांना मदतीचे पॅकेज जाहीर न झाल्यास तहसिलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेणार : मारुती चव्हाण

Archana Banage

इस्लामपुरातील स्व. अरुण सांभारे यांचे पहिले त्वचादान

Archana Banage