Tarun Bharat

शरीरात हे ५ बदल दिसत असतील तर Vitamin D ची कमतरता असते, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Advertisements

Vitamin D deficiency : शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असली की आजारांना निमंत्रण मिळते. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना व्हिटॅमिन डी च्या कमतरतेुळे अनेक व्याधींना सोमोरे जावे लागत आहे. यासाठी आपल्या शरीरात याची कमतरता आहे का हे जाणून घेणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व आपली हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्याचे काम करते. म्हणूनच लहाणपणी मुलांना सकाळच्यावेळी सूर्यकिरणात ठेवण्यास सांगितले जाते. याच्या कमतरतेचा परिणाम आपल्या मेंदूपासून ते केसांपर्यंत स्पष्टपणे दिसून येतो. तुम्हाला याचा सामना करू लागू नये यासाठी वेळीच काळजी घ्या. व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास शरीरात नेमके काय बदल होतात हे जाणून घेऊया.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय:

पाठ आणि हाडांमध्ये सतत दुखणे: व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराची कॅल्शियम क्षमता कमी होते किंवा संपते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि पाठ आणि हाडांमध्ये सतत वेदना होत राहतात.

नैराश्य आणि वाईट मनःस्थिती: जर तुम्हाला सतत विनाकारण नैराश्य आणि चिंता वाटत असेल आणि तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडत असाल, तर हे तुमच्या रक्तातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

थकवा जाणवणे: वेळेवर जेवण करून आणि पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे बळी आहात.

केस गळणे: केस खरबरीत होणे, गळणे आणि कोंडा हीणे हे देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत. कारण व्हिटॅमिन डी हे असे पोषक तत्व आहे जे केसांच्या मुळांना वाढण्यास मदत करतात.

दीर्घकाळ टिकणारी दुखापत: जर आपल्याला कुठेही सामान्य दुखापत झाली तर ती साधारणपणे ३-४ दिवसात बरी होते. पण जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर दुखापत बरी होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

हेही वाचा- भात खाण्याने खरचं वजन वाढते का? जाणून घ्या संशोधन काय सांगते


या गोष्टी भरपूर प्रमाणात खा

सॅल्मन फिश खा
मेथीचे दाणे खा
संत्र्याचा रस प्या
गाईचे दूध प्या
दही खा

टीप- वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

Related Stories

गांधीजींचा पथ्याहार

Omkar B

ओळखा कातडीचा कर्करोग

Omkar B

किडनी विकार आणि कोरोना

Omkar B

जाणून घ्या ‘ग्रीन टी’ पिण्याचे अनेक फायदे

Kalyani Amanagi

आला पावसाळा ओले मास्क टाळा

Amit Kulkarni

कोरोनामुळे मेंदूच्या आजारांचाही धोका

datta jadhav
error: Content is protected !!