आषाढी एकादशी उत्साहात : दर्शनासाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी :भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायणासह टाळ-मृदंगाचा नादही घुमला
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात रविवारी आषाढी एकादशी मोठय़ा भक्तीभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विठ्ठल मंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भजन, कीर्तन व ज्ञानेश्वरी पारायण, विठुनामाचा गजर व टाळ-मृदंगाचा नाद घुमला. याबरोबरच कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरातून भाविकांची गर्दी झालेली पहायला मिळाली. शहरासह उपनगरातील विठ्ठल मंदिरातून सकाळपासून भाविकांची वर्दळ दिसून आली. ज्यांना पंढरपुरात जाणे शक्मय नाही, त्यांनी विठ्ठल मंदिरातूनच पांडुरंगाचे दर्शन घेतले.
खडेबाजार विठ्ठल मंदिर
खडेबाजार येथील टेंगसे बंधूंच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी काकड आरती, अभिषेक व पूजा झाली. त्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर सायंकाळी मूर्तीला अभिषेक घालून पूजा-अर्चा करण्यात आली.
कार पार्किंग, बापट गल्ली
बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सकाळी काकडारती, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी पार पडले. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सुहास किल्लेकर, सदाशिव हिरेमठ यांनी सपत्नीक पूजा केली. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
तिसरा क्रॉस, महाद्वार रोड
तिसरा क्रॉस, महाद्वार रोड येथे ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढीनिमित्त सकाळी पूजा-अर्चा, अभिषेक झाला. त्यानंतर भजन झाले. दरवषीप्रमाणे नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. कपिलेश्वर मंदिर, शनिमंदिर, जत्ती मठ, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, सोन्या मारुती मंदिर, जुना पी. बी. रोडमार्गे पुन्हा मंदिरात प्रदक्षिणेची सांगता करण्यात आली. अध्यक्ष मारुती जोशीलकर यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. नगरसेविका नेत्रावती भागवत, माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर मंदिरात भजन, कीर्तन झाले. यावेळी भाविक आणि वारकऱयांनी त्याचा लाभ घेतला.
कपिलेश्वर देवस्थान
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त एकादश रुद्राभिषेक तसेच श्री ज्ञानेश्वरी पठण, श्री तुकाराम गाथा वाचन, श्रीविष्णू सहस्रनामावली पठण करून श्री शिवलिंगावर तुकाराम महाराजांची पगडी, टाळ-मृदंग, वीणा साकारून विशेष अलंकार पूजा करण्यात आली. पौरोहित्य नागराज कट्टी यांनी नरेश जाधव यांनी तुकाराम महाराजांची सुंदर अशी पगडी तयार करून दिली. आरास साकारण्यासाठी सचिन आनंदाचे, गणेश देवर, संजय मनगुतकर, दौलत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, अजित जाधव, यशवंत रजपूत, कल्लाप्पा ज्योती आदी सेवेकरी व ट्रस्टी उपस्थित होते.
बाजार गल्ली, वडगाव
बाजार गल्ली, वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिर विकास समितीमार्फत आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी 6 वाजता अभिषेक, रुद्राभिषेक, पंचामृत व इतर धार्मिक विधी झाले. त्यानंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले. त्याबरोबर वारकऱयांचे भजन झाले. तर संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
राजवाडा कंपाऊंड, वडगाव
राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथील संतश्रे÷ ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळी पूजा-अर्चा व इतर कार्यक्रम झाले. सामुदायिक अभिषेक, नैवेद्य, आरती आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर भक्तांनी ज्ञानेश्वरी अध्यायाचे वाचन केले. यामध्ये ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचा सहभाग होता. रात्री 8 ते 10 या वेळेत सांप्रदायिक भजन झाले. यावेळी वारकरी उपस्थित होते.
कॅम्प भावसार क्षत्रिय समाज भजनी मंडळ
कॅम्प येथील भावसार क्षत्रिय समाज भजनी मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्प परिसरात टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. यामध्ये भक्त, वारकरी सहभागी झाले होते. याबरोबर मंदिरात सकाळी पूजा-अर्चा करण्यात आली.
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलतर्फे दिंडी
कुंतीनगर खासबाग येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलतर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आदींचा पोषाख परिधान करून सहभागी झाले होते. याबरोबरच शाळांमध्येदेखील विठुनामाचा गजर पाहावयास मिळाला. प्रारंभी अध्यक्ष मिलिंद भातकाडे व सचिव मधुरा भातकांडे यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन केले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. शाळेच्या प्राचार्या साजिया, वृंदा कुलकर्णी, सृष्टी अनवेकर, रुपेश पावले आदी उपस्थित होते. पालखी सोहळय़ात संत महात्म्यांच्या वेषात विद्यार्थी सहभागी झाले होते.
रांगोळीतून रेखाटली दिंडीची प्रतिकृती
आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीने विठ्ठल दर्शनाला जाणाऱया वारकऱयांना रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. विविध कलेची आवड असलेल्या औषध दुकानदार म्हणून परिचित असलेल्या जयवंत साळुंखे यांनी 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी साकारली आहे. पंढरपूरला पायी चालत जाणाऱया दिंडीचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले आहे. विविध उपक्रम राबविणाऱया जयवंत साळुंखे यांनी वारकऱयांना रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन आपली कला सादर केली आहे. वेगवेगळी तैलचित्रे रेखाटणे, फोटोशूट करणे, सामाजिक कार्यात भाग घेणे तसेच नाटक आणि लघुपटामध्ये अभिनय करण्याचा छंद साळुंखे यांनी जोपासला आहे. विविध कला अंगी असल्याने त्या माध्यमातून ते नेहमीच वेगळा प्रयोग राबवत असतात. घरातील गणेश मूर्ती स्वतः बनवून प्रति÷ापना करण्याची परंपरा जोपासली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुराया आणि दिंडीचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले आहे.