Tarun Bharat

विठ्ठला…देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होऊ दे!

भाजपच्यावतीने विठूराया चरणी साकडे

सावंतवाडी/प्रतिनिधी-

Advertisements

सध्या राज्यातील राजकारणात तासा-तासागणिक उलथापालथ होत आहे. शिवसेनेतून बंड करून बाहेर गेलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे एकूण 49 आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अट शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.
                    याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा याकरिता शुक्रवारी सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर येथे जिल्हा भाजपच्यावतीने पुरोहितांहस्ते ग्रहयज्ञ तसेच पूजेचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी धुंडीराज ऊर्फ बाळू कशाळीकर, प्रसाद भागवत, श्रीपाद कशाळीकर, श्रीकृष्ण कशाळीकर, प्रसाद नाख्ये, आशिष पित्रे आदी पुरोहितांनी धार्मिक विधी केले.
                        या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, आनंद नेवगी, माजी नगराध्यक्ष संछू परब, माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,  जिल्हा महिला अध्यक्ष संध्या तेरसे, शहर महिला अध्यक्ष मोहिनी मडगांवकर, बंटी पुरोहित, दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, परिचीत मांजरेकर, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.

Related Stories

चाकरमान्यांचे संस्थात्मक क्वारंटाईन

NIKHIL_N

बांबूत गरिबांचे अर्थमान सुधारण्याची ताकद

NIKHIL_N

विशाल कडणेच्या कामाची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् कडून दखल

NIKHIL_N

आंबेली कसईनाथ मंदिर भाविकांसाठी बंद

NIKHIL_N

‘मत्स्य संपदा’साठी जिल्हय़ाचा 609 कोटींचा प्रस्ताव

Patil_p

कोकणात औषधी वनस्पती प्रकल्पासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका

Patil_p
error: Content is protected !!