नवी दिल्ली
विवो कंपनीचा विवो व्ही-27 प्रो हा फोन येत्या 1 मार्चला भारतीय बाजारात लाँच होणार असल्याचे सांगितले जात असून या फोनच्या किमतीचा खुलासा नुकताच झाला आहे. यानुसार या नव्या फोनची किंमत ही 38 हजार रुपयांच्या घरात असणार असल्याचे समजते. विवो 25 प्रोसारखाच हा फोन असणार असल्याचे संकेत आहेत.


8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसहच्या फोनची किमत 37 हजार 999 रुपये तर 8 जीबी/256 जीबी स्टोरज, 12 जीबी/256 जीबी फोन्सची किंमत अनुक्रमे 39 हजार 999 रुपये, 42 हजार 999 रुपये असणार आहे, असे समजते. फोटोग्राफीकरीता हा फोन उत्तम असल्याची माहिती आहे.