Tarun Bharat

ब्लादिमीर पुतीन गंभीर आजारी

ब्लड कॅन्सर असल्याचा दावा ः फार कमी वेळ शिल्लक असल्याचे मित्राचे वक्तव्य

वृत्तसंस्था / मॉस्को

Advertisements

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे गंभीर आजारी आहेत. रशियाच्या राष्ट्रपतींचे निकटवर्तीय असलेल्या एका धनाढय़ उद्योजकानुसार पुतीन यांना ब्लॅड कॅन्सर झाला आहे. परंतु त्यांचा कर्करोग कुठल्या स्थितीत आणि कुठल्या प्रकारचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंबंधीचा दावा एका ध्वनिफितीचा दाखला देत करण्यात आला आहे. पुतीन यांच्याकडे आता फार वेळ नसल्याचे यात म्हटले गेले आहे.

पुतीन गंभीर आजारी असल्याचे वृत्त समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांना पार्किंसन सारखा आजार असल्याचे म्हटले गेले होते. तर रशियाच्या सरकारने आतापर्यंत अशाप्रकारचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांना अफवा ठरविले आहे.

बिझनेस मॅगझीन ‘न्यूज लाइन’ने स्वतःच्या वृत्तअहवालात पुतीन यांच्या आजाराविषयी माहिती दिली आहे. नियतकालिकाने एक रशियन अब्जाधीश आणि पाश्चिमात्य उद्योजकामधील संभाषण रिकॉर्ड केल्याचा दावा आहे. पुतीन गंभीर आजारी असून त्यांनी स्वतःच्या हट्टापोटी रशिया, युक्रेन आणि अनेक देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. पुतीन यांच्यामुळेच जगाला अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे रशियन अब्जाधीश सांगत असल्याचे या ध्वनिफितीत ऐकू येते.

रशियाचे 15 हजार सैनिक ठार

या ध्वनिफितीत रशियन अब्जाधीश युद्धात रशियाचे 15 हजार सैनिक मारले गेल्याचे सांगताना ऐकू येतो. त्याच्यानुसार पुतीन आजारासोबतचे युद्ध जिंकू शकणार नाहीत, जर जिंकले तर त्यांना बहुधा सत्तापालटाला सामोरे जावे लागेल. या ध्वनिफितीतील रशियन अब्जाधीश कोण हे समजले असल्याचा दावा नियतकालिकाने केला आहे, परंतु त्याचे नाव जाहीर करणे टाळले आहे. ध्वनिफित 11 मिनिटांची असून काही काळापूर्वी युक्रेनच्या मिलिट्री इंटेलिजेन्सने देखील पुतीन यांच्या आजारासंबंधी माहिती दिली होती. तेव्हाही पुतीन यांना कर्करोग झाला असल्याचे सांगण्यात आले होते.

आजाराचे मिळाले संकेत

काही दिवसांपूर्वी पुतीन यांचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. पहिला व्हिडिओ बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा होता. व्हिडिओत लुकाशेंको यांची प्रतीक्षा करत असलेल्या पुतीन यांचा हात जोरजोराने थरथरत असल्याचे दिसून येते. तसेच पुतीन थरथरणारा हात छातीशी धरून लुकाशेंको यांच्या दिशेने अडखळत जात असल्याचे यात दिसून आले आहे.  तर त्यापूर्वी 12 मिनिटांच्या एका व्हिडिओत पुतीन हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान टेबलचा एक कोपरा सातत्याने पकडून बसलेले दिसत होते. यादरम्यान त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा आणि पाय हलत होता. पुतीन यांचा चेहरा सुजलेला दिसून येत होता. तसेच बोलताना त्यांचा आवाज अडखळत होता. मॉस्कोच्या सेंट्रल क्लिनिकल रुग्णालयाचे सर्जन येवगेनी सेलिवानोव्ह हे काळय़ा समुद्रातील पुतीन यांच्या महालात त्यांना भेटण्यासाठी 35 वेळा गेल्याचाही दावा आहे.  सेलिवानोव्ह थायरॉइड कॅन्सरचे तज्ञ आहेत.

Related Stories

कोरोना झाल्यास घाबरू नका !

Patil_p

सिगारेटची थोटकं जमा करणार कावळे

Patil_p

चीनचे मंगळावर पाऊल

datta jadhav

भारताशी मतभेद मिटविणार : चीनची नरमाईची भूमिका

Patil_p

ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलियाची नवी त्रिपक्षीय आघाडी

Amit Kulkarni

पाकिस्तानशी मैत्री वाढवत आहेत शेख हसीना

Patil_p
error: Content is protected !!