Tarun Bharat

ब्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू?

ब्रिटिश गुप्तचर अधिकाऱयांचा दावा ः रशियाच्या सत्तेवर तंतोतंत चेहऱयाचा व्यक्ती

वृत्तसंस्था  / लंडन

रशिया आणि युक्रेन यांच्यात भयानक युद्ध सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडून आला आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचीच सर्वाधिक चर्चा होतेय. पुतीन यांच्याबद्दल अनेक प्रकारचे रहस्ये आहेत. पुतीन यांचे आयुष्य, प्रकृतीबद्दल केवळ काही लोकांनाच माहिती असते.  याचदरम्यान ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय6’च्या प्रमुखांनी केलेल्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

ब्रिटिश अधिकाऱयांच्या दाव्यावर विश्वास ठेवणे प्रथमदर्शनी तरी अवघड आहे. ब्ा्रिटिश अधिकाऱयांच्या दाव्यापूर्वी पुतीन यांच्यासंबंधी अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. पुतीन यांचा मृत्यू झाल्याचे ‘एमआय6’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी एका अहवालात म्हटले आहे. तसेच रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या चेहऱयाशी साधर्म्य असणारा व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या जागी सामील होत असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर अधिकाऱयांनी केला आहे.

पुतीन यांच्या मृत्यूचे रहस्य त्यांचे सहकारी जगापासून अनेक आठवडे किंवा महिन्यांपर्यंत लपवून ठेवतील. सार्वजनिक कार्यक्रमांध्ये जो सध्या पुतीन म्हणून वावरत आहे, तो त्यांच्या चेहऱयाशी मिळताजुळता चेहरा असणारा व्यक्ती असल्याचे ब्रिटिश गुप्तचर अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे अत्यंत आजारी आहेत. पुतीन यांचा मृत्यू झाल्यास यासंबंधीची माहिती अनेक आठवडे किंवा कित्येक महिन्यापर्यंत लपवून ठेवण्यात येईल. कदाचित पुतीन यांचा यापूर्वीच मृत्यू झाला असण्याचीही शक्यता असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

पुतीन यांनी आजारपणादरम्यान चेहऱयाशी साधर्म्य असणाऱया व्यक्तींचा वापर केला असण्याची आणि आता क्रेमलिन देखील याचीच पुनरावृत्ती करत असल्याचे मानले जाते. रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱयांचा एक छोटा समूह असून त्याचे प्रमुख पुतीन आहेत. हा समूह पुतीन यांच्या प्रति अत्यंत निष्ठावान असल्याचे मानले जाते.

रहस्योद्घाटन होताच सत्तापालट

पुतीन यांच्या मृत्यूचे वृत्त समोर येताच रशियात सत्तापालट होत रशियाचे सैन्याधिकारी युक्रेनमधून सैन्य मागे बोलावतील, अशी भीती त्यांच्या सहकाऱयांना सतावत असल्याचे एका प्रसारमाध्यमाने म्हटले आहे. पुतीन यांच्या मृत्यूमुळे आपण कमकुवत होऊ आणि सत्ताही गमवावी लागेल अशी भीती असल्याने हे सहकारी पुतीन जिवंत असल्याचे दर्शवित असावेत अशीही चर्चा आहे.

Related Stories

१७ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने केले जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत

Rahul Gadkar

सापडला दुर्मीळ गुलाबी हिरा

Patil_p

सर्वाधिक निर्बंध झेलणारा देश ठरला रशिया

Patil_p

फिनलंड, स्वीडनच्या नाटो प्रवेशाचा मार्ग मोकळा

Patil_p

ओमायक्रॉनवर प्रभावी ठरलेल्या फायझरच्या गोळीला मंजुरी

datta jadhav

मॉलच्या मधोमध असलेले घर

Patil_p