Tarun Bharat

व्होडका कॉफी… पान चाय!

Advertisements

निग्राहाने मद्यपान न करणाऱया व्यक्तिंनाही कधीकधी एकदा तरी मद्याची चव चाखून पहावी, असे वाटते. जे केलेले नाही किंवा करायचेही नाही ते करावेसे वाटणे हा मानवी सहजभाव आहे. अशी माणसे अशी भावना मनात निर्माण झाली तरी आपल्या नियमानुसार मद्याला शिवत नाहीत. अशा व्यक्तींच्या भावनांना आऊटलेट असावे, म्हणून उद्योजक विकास सोनी यांनी दिल्लीत ‘चहा सुट्टा बार’ नामक एक चहाचे दुकान सुरू केले आहे. तसे ते सर्वसामान्य चहाच्या दुकानाप्रमाणेच आहे पण त्यांनी त्यांच्या कल्पकतेने त्याला वेगळे स्वरुप दिल्याने ते कमालीचे लोकप्रिय बनलेले आहे.

तेथे उपलब्ध असणाऱया चहा या पेयाला मद्यांची विविध नावे देण्यात आलेली आहेत. कॉफीचेही तसेच आहे. तेथील व्होडका कॉफी प्रसिद्ध आहे. नावात व्होडका असली तरी कॉफीत ती नसते. पण ज्यांना मनातल्या मनात व्होडका प्यावीशी वाटते पण प्रत्यक्षात प्यावीशी नसते असे अनेक लोक तेथे जाऊन खऱया व्होडकाच्या दुधाची तहान व्होडका नावाच्या कॉफीवर भागवितात, असाच प्रकार इतर पेयांबाबतीत घडतो. येथे पान नामक चहाही मिळतो. येथे नऊ वेगवेगळय़ा स्वादाचे चहा मिळतात. त्यांना अशीच कल्पनेने मद्यधुंद करणारी नावे देण्यात आली आहेत. या चाय सुट्टा बारच्या जागेचे भाडे महिना 50 हजार रुपये आहे. याशिवाय विजेचे बिलही महिना 40 ते 50 हजार येते. म्हणजेच 1 लाख रुपये भाडे आणि बिलापोटी देऊन शिवाय मालकासाठी बख्खळ नफा कमाविण्याइतकी ऐपत या दुकानाची आहे. सामान्यतः चहा विक्रीची दुकाने इतक्या क्षमतेची नसतात. मात्र लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेणे यालाच तर व्यावसायिकता म्हणतात. त्यामुळे मद्यपान न करणाऱयांना मद्यपानांचा काल्पनिक अनुभव देण्याची क्लृप्ती केवळ नावांच्या माध्यमातून देणारा हा उद्योजक बुद्धिमानच मानला पाहिजे. आता हीच कल्पनाशक्ती इतर अनेक शहरांमध्ये उपयोगात आणून आपल्या व्यवसायाच्या विस्तार करण्याची योजना विकास सोनी आणि फ्रांचायझी घेणारे सोनू चौधरी यांनी आखली आहे. त्यामुळे अनेक शहरांमधील चाहत्यांची सोय होईल.

Related Stories

के.एल.ई डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण

mithun mane

जगातील सर्वात धोकादायक पक्षी

Patil_p

बेघराने मुक्या प्राण्याला दिला निवारा

Patil_p

अंतराळात योगसराव

Amit Kulkarni

देशातील पहिले ग्रीन व्हिलेज

Amit Kulkarni

सर्वात महागडी बियर

Patil_p
error: Content is protected !!