बेंगळूर
या वर्षाच्या दुसऱया सहामाहीमध्ये सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरळीत होऊन उत्पादनदेखील सुरळीत होण्याची आशा कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. आगामी काळामध्ये आपल्या ग्राहकांना कार्सच्या पुरवठय़ामध्ये दहा टक्के इतकी वाढ केली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. पहिल्या तीन महिन्यांमध्ये उत्पादनामध्ये जवळपास 12 टक्क्यांची घट दिसली होती. उच्च प्री
मीयम गटातील कंपनीच्या कार्सना मात्र ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नोंदवला होता, याचा लाभ कंपनीला चांगल्या पद्धतीने झाला आहे.