AAP : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी आपल्या ट्विटद्वारे जाहीर केले की, गुजरात निवडणुकित (Gujrat Election) मिळालेल्या मतांमुळे आम आदमी पक्ष (AAP ) राष्ट्रीय पक्ष (National Party) झाला आहे. आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये त्यांनी “पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्यांची चर्चा झाली आहे.”
दिल्ली, पंजाब आणि गोव्यात आधीच राज्य पक्ष म्हणून ओळखला जाणारा, आम आदमी पार्टी AAP राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यापासून फक्त एक राज्य दूर होते. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी, राजकीय पक्ष किंवा संघटनेचे किमान चार राज्यांमध्ये असणे आवश्यक आहे. तर राज्य पक्ष म्हणून ओळखले जाण्यासाठी, विधानसभा निवडणुकीत किमान दोन जागा आणि 6 टक्के मते मिळवणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, “आम आदमी पार्टी गुजरात मधील लोकांच्या मतांमुळे राष्ट्रीय पक्ष बनत आहे” असे सांगून राष्ट्रीय राजकारणात प्रथमच शिक्षण आणि आरोग्याच्या राजकारणाचा ठसा उमटत आहे. त्याबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन.”


previous post
next post