प्रतिनिधी बेळगाव :
मतदान संदर्भात मतदारांना जागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., यांच्यासह विध्यार्थी इतर अधिकाऱ्यांनी भाग घेतला. धर्मवीर संभाजी चौक यामार्गे कॅम्प परिसरातून ही फेरी झाली.