Voting begins for buying and selling team in Malvan
भाजपप्रणीत पॅनेल आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत
मालवण तालुका खरेदी विक्री संघासाठी आज टोपीवाला हायस्कूल येथे मतदान शांततेत आणि उत्स्फूर्तपणे सुरू असून दुपारी बारा वाजेपर्यंत वीस ते 22% मतदान झाले होते. ग्रामीण भागातून मतदार उत्स्फुर्तपणे मतदानासाठी शहरात दाखल होताना दिसून येत होते. 3000 हून अधिक सभासद असलेल्या या घाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेल आणि महाविकास आघाडी पॅनल यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने टोपीवाला हायस्कूल परिसरात दाखल झाले होते.
मालवण / प्रतिनिधी