Tarun Bharat

गुजरातमध्ये आज 93 जागांसाठी मतदान

दुसऱया टप्प्यात 833 उमेदवार रिंगणात ः 14 जिल्हय़ात अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला

गांधीनगर / वृत्तसंस्था

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यात 14 जिल्हय़ातील 93 जागांवर सोमवार, 5 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या 93 जागांसाठी एकूण 833 उमेदवार रिंगणात उतरले असून काँग्रेस आणि भाजपच्या अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला लागणार आहे. 2017 मध्ये या 93 जागांपैकी भाजपने 51 तर काँग्रेसने 39 जागा जिंकल्या होत्या. तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. सोमवारी सायंकाळी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण होणार असून निकालासाठी गुरुवार, 8 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उत्तर आणि मध्य-पूर्व गुजरातमधील 14 जिल्हय़ातील 93 जागांवर म्हणजेच एकूण जागांच्या 51 टक्के भागात सोमवारी मतदान होणार आहे. ज्यामध्ये 74 सर्वसाधारण, 6 एससी आणि 13 एसटी जागा आहेत. तसेच एकूण 2.51 कोटी मतदार आपला हक्क बजावण्यासाठी पात्र असून त्यामध्ये 1.22 कोटी महिला आहेत. 18 ते 19 वयोगटातील 5.96 लाख मतदार आहेत. तर 90 वर्षांवरील 5,400 मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दुसऱया टप्प्यात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह 61 राजकीय पक्षांकडून 833 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये 285 अपक्षांचाही समावेश आहे. भाजप आणि आम आदमी पक्षाने सर्व 93 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. इतर पक्षांमध्ये, भारतीय आदिवासी पक्षाने 12 आणि बहुजन समाज पक्षाने 44 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

प्रमुख उमेदवार कोण?

दुसऱया टप्प्यातील निवडणुकीत मुख्यमंत्री आणि इतर 8 मंत्री रिंगणात आहेत, त्यात आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल, जगदीश विश्वकर्मा, मनीषा वकील, अर्जुन चौहान आदींचा समावेश आहे. याशिवाय 2017 मध्ये पाटीदार आंदोलनाचा चेहरा बनलेले हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी हे देखील उमेदवार आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे माजी मंत्री शंकर चौधरी यांच्या उमेदवारीचाही कस लागणार आहे.

सोमवारी होणाऱया मतदानात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया जागांमध्ये अहमदाबाद घाटलोडिया, नरोडा, वाटवा, विसनगर, थरड, महेसाणा, विरमगाम, गांधीनगर (दक्षिण), खेडब्रह्मा, मांजलपूर, वाघोडिया, खेरालू, दासकोई, छोटा उदेपूर, संखेडा आदींचा समावेश आहे. मतदान होत असलेला मोठा भाग आदिवासीबहुल असलेल्या मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या जागांवर आहे. या भागात गुजरातची राजधानी गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा आणि दूध उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या आणंदचाही समावेश आहे.

मोदी-शाह यांच्या क्षेत्रात मतदान

गुजरातमधील 93 जागांसाठी दुसऱया टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अहमदाबादमध्ये सुमारे 50 किलोमीटरचा रोड शो केला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मतदारसंघांचाही या टप्प्यात निवडणुका होणाऱया क्षेत्रात समावेश असल्यामुळे भाजपला प्रति÷sसोबतच निवडणुकीची धार मजबूत करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच विशेषतः उत्तर गुजरातमध्येही मतदान होत असल्याने काँग्रेससाठीही हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.

Related Stories

बांगलादेश संघाच्या कर्णधारपदी शकीब अल हसन

Patil_p

आत्मनिर्भरता, संशोधनाला प्राधान्य

Patil_p

मल्लिकार्जुन खर्गे आज काँग्रेस अध्यक्षपदी

Patil_p

लसीमुळे आतापर्यंत एकाचाही मृत्यू नाही!

Patil_p

..’तर एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल’

Archana Banage

उत्तर प्रदेश : माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची कोरोनावर मात

Tousif Mujawar